Uncategorized
अपघातात; दोन जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

अंबाजोगाई – वार्ताहर
शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटी जवळ आज मंगळवारी (दि.१०) कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारमधील सर्व प्रवाशी कारेपूर (ता. रेणापूर) येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.