Uncategorized

विज्ञान प्रदर्शन आणि नवभारत उल्हास मेळाव्याचे आयोजन

केज :- दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी

शहरातील साने गुरुजी निवासी विद्यालय येथे गट शिक्षण अधिकारी कार्यालय,पंचायत समिती केज आणि साने गुरुजी निवासी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळावा आणि 52 वें तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती केजचे कर्तव्य दक्ष गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिली.

या मेळाव्यास मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, आय.एस.एस.अधिकारी तथा केजच्या गट विकास अधिकारी अर्पिता ठुबे,प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी,शिक्षण अधिकारी माध्यमिक नागनाथ शिंदे,शिक्षण अधिकारी योजना संजय पंचगले उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात विविध विषयांवर आधारित थीम तयार करण्यात येणार आहेत.तसेच या मेळाव्यात सर्व प्रेरक प्रेरीका (समन्वयक),शाळा सहभागी होणार आहेत.

हा मेळावा उद्या दिनांक 11 डिसेंबर वार -बुधवार सकाळी 11 वाजता साने गुरुजी निवासी विद्यालय,धारूर रोड केज येथे होणार असल्याची माहिती केजचे कर्तव्य दक्ष गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!