Uncategorized

दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

अंबाजोगाई :- प्रतिनिधी

तालुक्यातील चनई येथील सिद्धिविनायक कॉलनी येथे श्री गुरु पादुका मठात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात भक्ती भावाने शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दत्त जयंती सप्ताह निमित्त श्री गुरुपादुका मठ (मंदिर) येथे श्रीगणेश याग, श्री.चंडी याग,श्री.विष्णू याग,श्री.स्वामी याग,श्री रुद्र याग,श्री दत्तयाग,असे याग घेण्यात आले तर रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पालखी सोहळा तसेच महाप्रसाद व सप्ताह सांगता करण्यात आली.या सप्ताहात श्री गुरुचरित्रासह आपण श्री स्वामी समर्थ सारामृत पोथी, श्री दुर्गा सप्तशती, सप्तशती गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र, नामजप या सारख्या सेवा ही करण्यात आल्या.या सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मठात जागा न मिळाल्यामुळे मठाच्या बाहेर उभे राहून स्वामींच्या आरतीसाठी प्रचंड गर्दी केली होती. याची भूपाळी आरतीने सुरुवात झाली व त्यानंतर दत्तयाग संपन्न झाला.

दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक पूजा करण्यात आली.तर दत्त जन्मानंतर महिलांनी सुंदर पाळणे म्हटले. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.या सर्व भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन सर्वज्ञेश्वर स्वामी भास्करे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!