Uncategorized

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

माजलगाव -( प्रतिनिधी )

देशाच्या सर्वोच्च सभागृहात भाषण करत असताना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल समस्त आंबेडकरी समुदायाची माफी मागावी, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी, लोकसभा सभागृहात, “आंबेडकर आंबेडकर आंबेडकर ही आत्ता फॅशन झाली आहे, एवढ्या वेळा देवाचं नाव घेतले असते तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळाली असती “, असे बेताल वक्तव्य करत देशातील समस्त आंबेडकरी समुदायाच्या भावना दुखावल्या असून, सदरील वक्तव्यातून भाजपा आणि संघांची जातीय द्वेष आणि आंबेडकर यांच्याबद्दल असणारी जळकुटी भावनाचं पुन्हा एकदा उलगडा होत आहे. तसेच आंबेडकरांच्या बद्दल बोलत असताना, देवाचे नाव पुढे करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तमाम आंबेडकरी समुदायास अपमानीत करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्याने देशातील समस्त आंबेडकरी समुदायाच्या भावना दुखावल्या असून, भाजपा नेते अमित शहा यांनी तातडीने देशाची माफी मागावी, अन्यथा देशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या समुदायाच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन उभे करू व त्यातून होणाऱ्या परिणामास केंद्रीय मंत्री अमित शहा यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देत जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे नेते तथा आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे भाजपा व अमित शहा यांनी आंबेडकरी समुदायाची माफी मागावी, असा जाहीर निषेध व्यक्त करत इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!