Uncategorized

अतिक्रमण धरकांवर बुलडोझर चालणार!

केज/प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारक व्यावसायीकांना २१ मार्च रोजी राज्य रस्ते महामंडळ संभाजी नगर येथुन नोटीस मिळाली असुन येत्या १५ दिवसाच्या आत अतिक्रमणे स्वतःहून काढावीत अन्यथा बुलडोझर द्वारे पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

यामुळे अनेक छोटे व्यावसायिक बेचैन झालेले असून पुढे आपले काय होणार? आपला व्यवसाय बंद करून घरीच बसावे लागणार की काय? असा प्रश्न केज येथील छोट्या व्यापाऱ्यांना पडलेला आहे.कोरोना महामारीच्या काळापासून या छोट्या मोठ्या व्यवसायिकांची वाताहत चाललेली असून यापूर्वी देखील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यातून काही व्यापारी अजूनही सावरलेले नसताना लगेचच नोटीस आल्यामुळे मुख्य रस्त्यावर छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांवर ही वेळ आल्यामुळे त्यांचे अनेक व्यवसाय बंद करून घरीच बसावे लागणार की काय अशी परिस्थिती झालेली आहे.यामध्ये अनेक व्यापारी असे आहेत की इकडे काम केल्याशिवाय घरी त्यांची चूलही पेटत नाही. अनेक व्यापारी खेडोपाड्यातून येऊन येथे व्यवसाय करतात.

किराया भरून आपला व्यवसाय करण्याची तयारी असणाऱ्या या व्यापाऱ्यांसाठी केज नगर पंचायत मार्फत काही पर्यायी व्यवस्था होणार आहे काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!