Uncategorized

मोफत पाणपोईचा शुभारंभ

केज :- प्रतिनिधी

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर युवा नेते राजपाल भैया काकडे यांच्या वतीने बनसारोळा येथील बसस्थानक परिसरात मोफत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईवर नागरीकांना थंडगार जारचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.त्यामुळे उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याची मोफत सोय झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली आहे.

या पाणपोईचा शुभारंभ जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर काकाजी मुंदडा, यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.तर श्री.गुरू पादुका मठ, चनईचे समीर दादा भास्करे, ह.भ.प समाधान महाराज गोरे,बजरंग बाप्पा काकडे, माजी सभापती नेताजी पापा शिंदे, निषाद अकॅडमीचे प्रकाश बोरगावकर,अंबा साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकराव काकडे, दत्ता आण्णा काकडे,राजपाल भैया काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत धायगुडे, प्रवीण बासटवार, बाळासाहेब यादव, धनराज लाटे, विवेक कदम, रमेश पुजारी,वसंत वाघमारे, प्रवीण आदमाने,अनिकेत फस्के, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!