Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पालिकेचा गलधान कारभार

पिंपरी चिंचवड :- कामगार नगर पिपंरी येथे महानगर पालिकाच्या विद्युत पोल मधून विजेचा धक्का लागून चार कुत्री ( श्वान) मरण पावली त्यांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या महानगर पालिका चे विद्युत कार्यकरी अभियंता , ठेकेदार प्रवीण इलेक्ट्रिक प्रो. सुर्यवंशी व सब ठेकेदार राज सलगर यांवर सदोष प्राणी वधाचा गुन्हा दाखल करवा.कामगार नगर पिंपरी येथे 19/5/25 रोजी महानगरपालिका विद्युत विभाग कार्यकारी अभियंता व सबंधित ठेकेदार प्रवीण इलेक्ट्रिक प्रो सुर्यवंशी व सब ठेकेदार राज सलगर यांच्या हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणे फक्त मलई वर ताव मारणेच्या गंभीर प्रकारा मुळे इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल ची विद्युत् प्रवाह केबल (सडलेली) खुली ठेवल्याने 4 भटकी कुत्री (श्वान) त्या पोल जवळ गेली व विद्युत प्रवाहाच्या जोरदार धक्क्याने त्या निष्पाप निरागस प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला.
सदर इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल ठिकाणी रामकृष्ण अपार्टमेंट सोसायटी आहे जर या सोसायटीतील रहिवासी किंवा पादचारी पावसाचे पाणी व त्या इलेक्ट्रिक पोल च्या संपर्कात आले असते तर मोठी जीवित हानी झाली असती.
म्हणून ,जबाबदार महानगरपालिका विद्युत विभाग कार्यकारी अभियंता व सबंधित ठेकेदार प्रवीण इलेक्ट्रिक प्रो .सुर्यवंशी व सब ठेकेदार राज सलगर यांवर 4 निष्पाप निरागस प्राण्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेने संबंधितावर सदोष प्राणी वधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई
करावी, असे सचिन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!