Uncategorized
घाटनांदुर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

अंबाजोगाई :- तालुक्यातील घाटनांदुर येथे ॲड. माधव आप्पा जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी घाटनांदुर कडकडीत बंद पाळण्यात आला.
याबाबत वृत्त असे की,परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दिवशी ॲड. माधव आप्पा जाधव यांना मारहाण झाली आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याचे पडसाद घाटनांदुर मध्ये ही उमटले.घाटनांदुर येथे एव्हीएम मशिनची तोडफोड करण्यात आली होती.त्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 40 जणावरती गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. घाटनांदुरचे सुपुत्र ॲड माधव आप्पा जाधव हे शरद पवार गटाचे नेते असून त्यांना मारहाण करण्यात आली.त्याच्या निषेधार्थ घाटनांदुर येथे दिनांक 21 रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.