राजकीय

बीड लोकसभेचा उमेदवार जाहीर!

बीड :- आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे.सर्व पक्ष उमेदवाराच्या चाचपण्या करत आहेत.तर जे उमेदवार फायनल झाले आहेत अशांची निवड जाहीर करत आहेत.या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होतानाही पाहायला मिळत आहे.

लोकसभेचे उमेदवार जाहीर करताना काही पक्षांना जिथे खूप मेहनत करावी लागत आहे.तिथे मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुजन भारत पार्टीच्या लोकसभा निवडणूक-2024 साठीची तिसरी यादी लोकसभा उमेदवार निवड समिती सदस्य बालाजी गजळे यांनी नुकतीच जाहीर केली.त्यात बीड लोकसभा मतदार संघातून हनुमंत ज्ञानोबा ताकतोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे यांनी एका सामान्य कुटुंबातील सुशिक्षित, कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसलेला मात्र सामाजिक चळवळीत काम केले असल्याने सर्व जनतेच्या परिचयाचा उमेदवार जाहीर करून बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत रंगत वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!