शैक्षणिक

आदर्श शिक्षक श्री.विष्णू बचुटे सेवानिवृत्त.

आदर्श शिक्षक विष्णू बचुटे सेवानिवृत्त.

केज:- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे आदर्श शिक्षक विष्णू संभाजी बचुटे हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे आदर्श शिक्षक विष्णू संभाजी बचुटे हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम युसुफ वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळेत आयोजित करण्यात आला होता.भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून विष्णू संभाजी बचुटे यांची ओळख होती.तीस वर्षांच्या सेवेनंतर ते आज नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले विष्णू बचुटे यांची माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथून शिक्षकी पेशास सुरवात झाली.अत्यंत हुशार आणि इंग्रजी सारखा अवघड विषय अगदी योग्य प्रकारे समजाऊन सांगण्याचे त्यांचे कौशल्य होते. विद्यार्थ्यांना आपलंसं करून अध्यापन करणे हे त्यांचे कौशल्य होते. माजलगाव तालुक्यात शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रीय मुख्याध्यापक अशा पदावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.विद्यार्थी आणि पालकांचा समन्वय साधून काम करण्याची त्यांची कला होती.माजलगाव तालुक्यात तेरा वर्षे नोकरी केल्यानंतर केज तालुक्यातील भालगाव नं.1 येथे त्यांची बदली झाल्यानंतर भालगाव सारख्या अत्यंत लहान अशा गावात आपल्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिकवणीतून अनेक पिढ्या घडवल्या.गोर गरीबांची मुल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.त्यांनी शिकवलेली अनेक विद्यार्थी आज विविध पदांवर कार्यरत आहेत.

आज तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानाप्रमाणे ते सेवानिवृत्त झाले.या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक श्री.काळूमाळी ,सरपंच प्रतिनीधी सचिन जावळे,युसुफ वडगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.भोसले,इरा इंग्लिश स्कूल चे बापूसाहेब भुसारी,जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल दत्तात्रय मुजमुले,पत्रकार सचिन उजगरे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक वर्ग,मित्रपरिवार,आप्तेष्ट उपस्थित होते.

चौकट:- अवघड विषय देखील ते विद्यार्थ्यांना कसा सोपा वाटला पाहिजे,तो कसा समजाऊन सांगायचा आणि त्यांच्या अंगी सहज उतरवणारे शिक्षक म्हणजे श्री.बचुटे सर.त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा:-

दत्तात्रय मुजमुले(अध्यक्ष जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल धनेगाव कॅम्प)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!