पशू पालकांनी आपापल्या पशूंना लंपी प्रतिबंधक लसीकरण” करून घेण्याचे आवाहन

केज :- दत्तात्रय मुजमुले
गोवंश जनावरांमधील लम्पी त्वचारोगामुळे राज्यात दहशतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. गायीचे दूध प्यावे की नाही, अशीही भीती काहींच्या मनात आहे. मात्र, ‘यात काहीच तथ्य नसून, अगदी लम्पी झालेल्या गायीचे दूधसुद्धा मानवासाठी सुरक्षित आहे’, असे डॉ.श्रीकृष्ण थळकरी यांनी बोलताना सांगितले आहे.
लम्पी स्किन डिसीजमुळे जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, डोळे आणि नाकातून स्राव, दूध उत्पादन कमी होणं आणि आहार घेण्यात अडचण निर्माण होणं ही लक्षणं दिसतात. विशेषतः ज्या जनावरांना यापूर्वी विषाणूचा संसर्ग झालेला नाही, त्यांच्यासाठी हा विषाणूजन्य संसर्ग घातक ठरू शकतो. या आजारामुळे गाभण गायी आणि म्हशींचा गर्भपात होतो.त्यामुळे जनावरांना “लंपी प्रतिबंधक लस ” आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध ठरू शकते त्यामुळे पशूपालकांनी “लंपी प्रतिबंधक लसीकरण” करुन घ्यावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रीकृष्ण थळकरी,डॉ.सौ.व्ही.आर.ओहाळ यांनी मौजे आनेगाव येथे लंपी लसीकरण मोहीमे अंतर्गत लसीकरण करताना सांगितले आहे.
चौकट :- लंपी हा त्वचारोग केवळ गोवंशातील विषाणूजन्य रोग आहे.हे विषाणू मानव जातीला घातक नाहीत.प्रत्येक गावात “लंपी प्रतिबंधक लसीकरण” करण्यात येत आहे.पशू पालकांनी आपापल्या पशूंना लस टोचून घ्यावी.:- डॉ. थळकरी पशुधन विकास अधिकारी, केज