आरोग्यसामाजिक

साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे सोनेसांगवी येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने मौजे सोनेसांगवी येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात 21 रक्तदात्यानी रक्तदान केले तर आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह तपासणी,रक्तदाब तपासणी शिबिरात 55 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.या आरोग्य शिबिरास गावातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेत आरोग्य तपासणी व रक्तदान केले.

या शिबिरास सरपंच मुकुंद कणसे,सरपंच राहुल डिकले,वैद्यनाथ ब्लड सेंटरचे संचालक बिभीषण सांगळे,युसुफ वडगाव आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सुचिता देशमुख,आरोग्य सेविका अनुसया साळुंके,आरोग्य कर्मचारी सतीश गीते,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे ,राजमुद्रा मेडिकल फौंडेशन चे सचिव ज्ञानेश्वर गिरी,वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर सोनवणे,ग्रां.प सदस्य बब्बर शेख, पत्रकार दत्तात्रय मुजमुले,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सूरज गालफाडे,आकाश गालफाडे,युवराज वैरागे,दत्ता साखरे,बाळासाहेब गालफडे,दीपक गालफाडे,प्रमोद गालफाडे,निलेश गालफाडे,नितीन कसबे व लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते गावातील नागरिक,तरुण मित्र मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!