Uncategorized
मौजे कळंबआंबा येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे कळंब आंबा येथे मागील तीन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व जालना येथील आंतरवली येथे मनोज जरंगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बालासाहेब जगताप व सकल मराठा समाजाच्या वतीने हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे,मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे यादी मागण्यांसाठी 13 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
यावेळी बालासाहेब जगताप,सरपंच शशिकांत इंगळे,उपसरपंच नितीन वाघमारे,सतीश इंगळे,शिवाजी इंगळे,माजी सरपंच सिद्धेश्वर इंगळे,माजी सरपंच अनिल इंगळे,अशोक वाघमारे, चर्मकार महासंघ केज तालुका अध्यक्ष उद्धव भैय्या मस्के, नानासाहेब देवकर, अविनाश नाना टोम्पे, श्रीनिवास बाप्पा इंगळे कांता दिगंबर इंगळे उपस्थित होते.