Uncategorized

केज येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा संपन्न

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे तांबवा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस काॅ.नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.गोविंद साळवे बीड तालुका अध्यक्ष,काॅ.सखाराम पोहीकर गेवराई तालुका अध्यक्ष,,काॅ.सिद्दार्थ देशमाने धारुर अध्यक्ष,काॅ.सचिन गाडेकर माजलगाव अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.

सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ राज्य (आयटक) कार्यकारणी बैठकीत झालेले निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी यांना सांगण्यात आले.तर खाजगी करणाच्या शासन धोरणाचा निषेध कर्मचाऱ्यांनी नोंदवला.तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर २३ आक्टोंबरला शासनाच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन करुन निवेदन देनार आहेत, त्या करीता बीड जिल्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

मेळाव्यास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे केज तालुकाध्यक्ष काॅ.मसू कांबळे,उपाध्यक्ष काॅ.हामीद शेख,सचिव काॅ.भगवान चाटे यांच्यासह सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संकेत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काॅ.हामीद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन काॅ.मसू कांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!