अ. भा.परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी सुमंत गायकवाड

माजलगाव :- दत्तात्रय मुजमुले
माजलगाव येथील परिवर्तनवादी कवी सुमंत गायकवाड यांची अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी केली आहे
परिवर्तनवादी सुप्रसिद्ध कवी,लेखक शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक चळवळीत कार्य करणारे मानाचे अनेक पुरस्काराने सन्मानित “नामांतर” काव्यसंग्रहकार तथा अनेक साहित्यिक उपक्रम आयोजनाचा हातखंडा असणारे कवी सुमंत गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
नवोदित कवी,कवयित्री, लेखक,साहित्यिकांना एक साहित्यिक सामाजिक,वैचारिक, प्रगल्भ विचारपीठ भविष्यात निर्माण करून द्यावे व कविसंमेलन साहित्य संमेलन आयोजित करून साहित्यकांसाठी साहित्य चळवळ उभी करावी अशी अपेक्षा ही साहित्य परिषदेने निवड पत्रात व्यक्त केली आहे यानुसार भविष्यात साहित्य क्षेत्रात प्रभावी काम करण्याचा मनोदय असल्याचा कवी सुमंत गायकवाड यांनी सांगितले.
सुमंत गायकवाड यांच्या निवडीबद्दल साहित्यक प्रा.स्नेहल पाठक, लेखक उमेश मोहिते,प्रा.राहुल कांबळे,डॉ.वरुण तौर,डॉ. विठ्ठल वाघ,डॉ. अंजली घुबडे,प्रेमा कुलकर्णी ना.मा.पडलवार, प्रा.संगीता जाधव,कवयित्री गीता होके/सोळंके,शोभा वर्मा,सुरेखा कोकड,प्रतिभा थीगळे राही फपाळ,रुपाली बोरखडे, शेख शबाना,संजवनी मेहत्रे, हर्षदा एखंडे वैशाली देशमाने कु.यशश्री लाव्हरे,कवी ऍड.दत्ता जाधव,औदुंबर कातारे,लहू आगजळ, मोहन राठोड,वैभव सोळंके,लहू अवघडे यांनी अभिनंदन केले आहे