Uncategorized

धनगर समाजाचे केज तहसीलदारांना निवेदन

केज :- दत्तात्रय मुजमुले

राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या अंगरक्षकांनी धनगर समाजातील एका व्यक्तीला धक्काबुक्की करत मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी.म्हणून सदरील घटनेच्या निषेधार्थ व राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांना एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या करिता बुधवारी केज शहर बंदचे आवाहन केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार केज यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाज बांधवांच्या विविध मागण्याचे निवेदन धनगर समाज बांधवांच्या एका कार्यकर्त्यांनी देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोक्यात भंडारा उधळ ल्याच्या कारणावरून त्यांचे कार्यकर्ते व अंगरक्षक यांनी सदरील धनगर समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांनाधक्काबुक्की करून हाणमार केल्याच्या निषेधार्थ व संपुर्ण राज्या तील धनगर समाज बांधवांना या प्रवर्गातून आरक्षण मिळण्या संदर्भात तसेच विविध मागण्या संदर्भात केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी बुधवारी सकाळी १०-०० वाजल्या पासुन केज शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदरच्या मागणीचे निवेदन केज तहसीलदार व केज पोलीस ठाणे यांना तसे लेखी निवेदन सकल धनगर समाज बांधव समाज यांच्या वतीने देण्यात आले आहे.सदरील निवेदनावर केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने बाळासाहेब गाढवे,राजाभाऊ डुकरे, ओम चादर,अजय गुरव यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

केज तालुक्यातील व शहरातील व्यापारी बांधव आणी शहरातील नागरिकांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजीच्या धनगर समाज बांधवांच्या केज शहर बंदच्या आवाहनाला सहकार्य करावे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बाळासाहेब गाढवे व राजाभाऊ डुकरे यांनी सर्व व्यापारी बांधवांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!