Uncategorized

आज मराठा समाजाच्या वतीने बोरीसावरगाव येथे रस्ता रोकोचे आयोजन

केज/प्रतिनिधी:

वाशी येथे ठरल्याप्रमाणे ‘सगेसोयरे’ या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी व आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी संघर्षयोद्धे मा.मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी (ता.अंबड जि. जालना) येथे ८ जून पासून आमरण उपोषणास बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज केज तालुका यांच्या वतीने आज दि.१३ जून २०२४ रोजी गुरुवारी सकाळी ९ वाजता कळंब-अंबाजोगाई मार्गावरील बोरीसावरगाव (ता केज) येथे लोकशाही मार्गाने शांततेत रस्ता रोको चे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाकडे राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात तथा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण योग्यरीत्या सोडवावे यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे गुरुवारी (दि १३) सकाळी ९ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी या आंदोलनास पंचक्रोशीतील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाज केज तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!