आरोग्य
रुग्णालयाची प्रचंड दुरवस्था पाहून खासदार भडकले.

बीड :- बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सायंकाळच्या सुमारास बीडच्या जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट केली. खासदार रुग्णालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी पाढाच वाचून दाखवला. रुग्णाच्या नातेवाईकांचे रडगाणे ऐकून आणि जिल्हा रुग्णालयातील दुरावस्था पाहून खासदार बजरंग सोनवणे हे चांगलेच भडकले. माझी सरप्राईज व्हिजिट होती त्यामुळे मी आता संधी देतोय दुसऱ्यांदा आल्यावर असं काही आढळून आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच खासदार सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.