आरोग्य

राजमुद्रा मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने डॉ दत्ता तपसे यांचा वाढ दिवस विविध उपक्रमाने संपन्न

केज :- दत्तात्रय मुजमुले

राजमुद्रा मेडिकल फाऊंडेशन व कॅगमो डॉक्टर्स असोशिएशन च्या वतीने मौजे माळेगाव येथे डॉ दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

याचा शुभारंभ राजमुद्रा मेडिकल फाऊंडेशनचे सचिव ज्ञानेश्वर गिरी, कॅगमो राज्य उपाध्यक्ष डॉ निलेश भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिरा मध्ये भव्य रक्तदान शिबिर,मोफत नेत्र तपासणी,मोफत CBC BLOOD टेस्ट करण्यात आली.या तपासणी मध्ये तब्बल 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 45 लाभार्थ्यांनी CBC तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ आठवले साहेब, युसूफ वडगाव PHC चे वैद्यकीय अधिकारी डॉ केशव सारूक,वैद्यकीय अधिकारी डॉ विवेक खोडवे, डॉ.प्रदीप सोनवणे,डॉ निलेश भालेराव,डॉ.शरद गीते,डॉ.अविनाश अघोर यांनी आरोग्य तपासण्या केल्या.

या शिबिरासाठी वृक्षवल्ली चे अध्यक्ष राहुल केंद्रे,वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,वंचितचे जिल्हा सचिव नितीन बचुटे,गावातील युवा उद्योजक गणेश चिरके,युवा नेते कैलास गव्हाणे,युवा नेते,अविनाश गव्हाणे,युवा नेते दीपक दोडके,युवा नेते उत्तम लोकरे,मसा बचुटे,सर्जेराव लोखंडे,रेणुका ब्लड चे ऋषिकेश चोले,वंचितचे अमर ओव्हाळ,कमलाकर सोनवणे,पत्रकार दत्ता मुजमुले,निलेश साखरे,असद शेख,अश्रूबा वाघमारे,रामा तांबारे,बाळासाहेब खाडे, drx लक्ष्मण भालेराव,drx विष्णू गिरी,व गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!