आ.मुंदडा यांची प्रचारात जोरदार मुसंडी;नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

केज :- प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघात अनेक नवनवीन घडामोडी घडत असल्याने विधानसभा निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे.विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असल्याचे चित्र दिसून येत आहे.विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या विकासाचा मुद्दा विरोधकांची झोप उडवत आहे.विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक असल्याचे मत आमदार मुंदडा व्यक्त करत आहेत.
आ.मुंदडा यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने डिघोळअंबा, कोदरी, उमराई, सनगाव, धावडी व केंद्रेवाडी या गावांना भेटत देत ,विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधत मतदार संघाच्या विकासासाठी मतदान करण्याचे आणि मतदानरुपी आशीर्वाद देत साऱ्या मतदार बंधू-भगिनींनी पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांशी केले.
यावेळी ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.