अंबाजोगाई येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न

अंबाजोगाई :- प्रतिनिधी
केज विधानसभेच्या उमेदवार नमिताताई मुदडा यांच्या प्रचारासाठी काल (दि.१२ नोव्हे.) भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अंबाजोगाई येथे आले आसता मी कधीच भुलथापा देत नाही तुम्ही नमिताताई मुंदडा यांना निवडून द्या मी चार महिन्यात चार पदरी रस्ता करून देतो असे उपस्थितांना आश्वासित केले.
महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी कधी जाततीयवाद केला नाही. कोणतीही योजना देताना जात पाहिली गेली नाही. सर्वांना समान योजना देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. परंतु काही लोक दलितांना संविधान बदलण्याच्या भाषा करतात आम्ही संविधान बदलणारे नाहीत. व बदलू ही देणार नाहीत. असा ठाम विश्वास उपस्थितांना त्यांनी दिला. तसेच मुस्लिमांना भाजपा हा मुस्लिम विरोधी आहे, जातीवादी आहेत,अशी भीती दाखवून मुस्लिमांचे मत घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे सर्वांनी विकास करण्यासाठी विकासाला मत द्याव आशी नम्र विनंती केली.
तुतारीवाल्याने आपला पराभव केला, आता तुतारीवाल्याचा पराभव करा:- आ. पंकजाताई मुंडे
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे सांगितले की, मी महाराष्ट्रभर प्रचार करत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील केजची मी जागा दत्तक घेतलेली आहे. यामुळे तुम्ही नमिता ताई अक्षय मुंदडा यांना निवडून आणा,असे मत व्यक्त केले. व स्टेजवर बसलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली की, नमिताताईला निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मला दुसऱ्यांच्या सेवेसाठी जायचे आहे. यामुळे आपण सर्वांनी ही निवडणूक तुमची आहे म्हणून लढायची आहे व नमिताताईंना निवडून द्यायचे आहे. त्याचबरोबर ही निवडणूक माझ्या अस्मितेची नसून ही निवडणूक तुमच्या अस्मितेची आहे. तुतारीवाल्याने आपला पराभव केला आता तुतारीवाल्याचा पराभव करा, अवाहन करत आपण करत आपण सर्वांनी नमिता मुंदडा यांना निवडून द्यावे अशी विनंती आ. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.