Uncategorized

महामानवाचे बॅनर फाडून अवमान, वाहनाचे नुकसान केजमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा

केज/प्रतिनिधी

केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील एका किराणा दुकानावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचे बॅनर लावलेले असून सदर बॅनर फाडून अवमान केल्याप्रकरणी व एका चार चाकी वाहनाचे नुकसान केले प्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री एक १-४५ ते २-०० वा.सुमारास केज शहरातील एल.एफ.सी.चौक महात्मा फुले नगर या ठिकाणी प्रदीप काशिनाथ गायकवाड रा. महात्मा फुले नगर केज यांची मारुती सुझुकी कंपनीची चार चाकी गाडी क्र.एम.एच.१६ झेड ३७७६ सदर गाडीचे काचा वरील दोन्ही बाजूचे वायफर तोडून गाडीच्या बाजूला टाकून दिले होते. प्रदीप गायकवाड यांच्या गाडीचे २५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०-०० वाजता प्रदीप गायकवाड हे एल.एफ.सी. चौक येथे गाडी लावलेल्या ठिकाणी गेले असता सदर प्रकार हा त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर प्रदीप गायकवाड यांनी त्यांची गाडी उभा केलेल्या ठिकाणच्या समोरच्या एका घराचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता सुमित कैलास लांडगे रा. फुलेनगर केज व त्यांच्यासोबत अनोळखी इस्मानी सदर गाडीचे नुकसान केले आहे. त्याच दिवशी सदर वेळेमध्ये तात्या लहू गवळी रा. महात्मा फुले नगर केज यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचे बॅनर त्यांच्या स्वतःच्या किरण दुकानासमोर भिंतीवर लावलेले आहे. सदर बॅनर वर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांचे फोटो व तात्या गवळी व त्यांच्या मुलाचा फोटो असलेले बॅनर हे सुमित कैलास लांडगे याने पडले आहे. तात्या गवळी यांच्या किराणा दुकानाच्या समोरील भिंतीवरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर सुमित लांडगे याने जाणीवपूर्वक फाडून महामानवाचा अवमान केला आहे.सुमित लांडगे याने प्रदीप गायकवाड यांच्या गाडीचे वायफर तोडून नंतर महामानवांचे असलेले फोटोच्या बॅनर वर तात्या गवळीचा फोटो फाडून खाली नाचत आला. त्यावेळी येथून समोरून चार जण जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत.

सदर प्रकरणातील सुमित लांडगे व त्याचे इतर चार साथीदार व मुख्य सूत्रधार कोण आहे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे तात्या गवळी व प्रदीप गायकवाड यांनी पोलीस ठाणे केज येथे समक्ष हजर होऊन दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चौधरी हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!