राजकीय
अखेरच्या फेरीपर्यंत निकालाची रंगत !

केज :- केज विधानसभा मतदार संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोमांचक अशी झाली.शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या या लढतीत अखेर नमिता मुंदडा यांनी बाजी मारली.
केज विधानसभा मतदार संघात नमिता मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांच्या दोघात खरी लढत पाहायला मिळाली.नमिता अक्षय मुंदडा भारतीय जनता पार्टी १,१७,०८१ मते मिळाली तर पृथ्वीराज शिवाजी साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)यांना १,१४,३९४ मते मिळाली.ईतर २२ लहान मोठे उमेदवार १६,५८५ मते मिळाली आहेत.
त्यामध्ये महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा २६८७ मतांनी विजयी घोषित करण्यात आल्या.