Uncategorized
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

केज :- वार्ताहर
तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या झालेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या घटनेने लोकामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होऊन आक्रमक पवित्र घेत मस्साजोग येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या घटनेसंदर्भात केज विधानसभेच्या आमदार आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे.