सामाजिक

केज येथे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

केज येथे पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

केज :- दत्तात्रय मुजमुले

केज येथील अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या उध्दव स्वामी इनाम मैदानावर शुक्रवारी ( दि. २९ ) सकाळी १० वाजता जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे पुजन, दर्शन व प्रवचन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.   

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता केज शहरातील शिवाजी चौकापासून भव्य दिव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. यात प्रथम निशाणधारी पुरुष व महिला, ढोलपथक, कलशधारी महिला, राम पंचायतन, देखावे, भजन मंडळ, पादुका रथ, भक्त मंडळ सहभागी होणार आहेत. श्री चे पादुका पुजन सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.        

या भव्य सोहळ्याला बीड जिल्ह्यासह अनेक भागातून भाविक भक्त, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे या सोहळ्याची जय्यत तयारी, प्रचार व प्रसार गेल्या महिन्यापासून स्व – स्वरूप संप्रदाय बीड जिल्ह्याचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जनम प्रवचनकार, भक्त करत आहेत. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचा भक्तवर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे कार्यक्रमस्थळी भव्य असा मंडप उभारला असुन येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या  सोहळ्याला बीड जिल्ह्यातील सर्व भाविक, भक्तांनी उपस्थित राहुन या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व – स्वरुप संप्रदायचे बीड जिल्हा निरिक्षक अमोल कुलकर्णी, बीड जिल्हा अध्यक्षा पद्मीन तांदळे व बीड जिल्हा सेवासमितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!