सामाजिक

ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी अपघातग्रस्त तरुणाचे वाचवले प्राण*

मुंडेंसाहेबांचा फोन अन अँब्युलन्स दोन मिनिटातच हजर, मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत

परळी (दि. 02) – बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे.

बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.

धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली, आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले.

त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला, धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली; धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.

सदर तरुणास अंबाजोगाई कडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली, त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला, तसेच त्यांनाही अंबाजोगाई ला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!