आरोग्य

महा आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा :- ज्ञानेश्वर गिरी

केज :- दत्तात्रय मुजमुले राजमुद्रा मेडिकल फाऊंडेशन व कॅगमो डॉक्टर असोसिएशन संघटनेच्या वतीने राजमुद्रा मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कॅगमो संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 सप्टेंबर 2023 वार मंगळवार रोजी ठीक सकाळी 10 ते 1 पर्यंत महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.गावासह परिसरातील नागरिकांना या महा आरोग्य शिबीराचा लाभ असे आवाहन ज्ञानेश्वर गिरी यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये भव्य रक्तदान,मोफत कॉम्पुटर द्वारे डोळे तपासणी,उच्च रक्तदाब,मधुमेह संधिवात,सर्व रोग निदान शिबीर स्मपन्न होणार आहे .या शिबिरासाठी प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणून कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी सर, डॉ सुधीर आवटे सरMBBS MD ,डॉ सुरज कोठावळे MBBS MD, डॉ निलेश भालेराव MBBS MD,डॉ देशमुख, MBBS ORTHO, डॉ केशव सारूक MBBS,डॉ अविनाश अघोर Optometrist,डॉ नितीन साखरे MBBS,डॉ विवेक खोडवे BAMS,डॉ दत्ता तपसे MBBS ,डॉ आकाश बचुटे (MS ENT),डॉ प्रदीप सोनवणे BDS,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,जिल्हा सचिव नितीन बचुटे,जिल्हा उपाध्यक्ष अमरजित ओव्हाळ,कमलाकर सोनवणे ,श्रीराम तांदळे (पत्रकार संघ अध्यक्ष),दत्ता मुजमुले(स्टार 24 न्युज) राहुल केंद्रे (अध्यक्ष वृक्षवल्ली बहु उद्देशीय संस्था) ऋषिकेश चोले (रेणुका ब्लल्ड सेंटर धाराशिव)यांची शिबिरास उपस्थिती लाभणार आहे.

या महा आरोग्य शिबीराचा परिसरातील सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर गिरी व संस्थेचे कोषाध्यक्ष महादेव राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!