इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेतील गुणवंतांचा होणार गुणगौरव

केज:- प्रतिनिधी
केज येथे लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन अधिकार आंदोलन यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील मातंग समाजातील इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील मातंग समाजातील इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह विज्ञान शाखेच्या नीट व एमएचसीईटी परीक्षेत मेडिकल प्रवेशास पात्र झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा स्मुर्ती चिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन अधिकार आंदोलन यांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी १६ जूनपर्यंत गुणपत्रकासह संपर्क साधावा. असे आवाहन संयोजक रमेश पाटोळे, राम शेंडगे, बाबुराव गालफाडे यांनी केले आहे.
दरम्यान, केज तालुक्यात नुकत्याच लागलेल्या निकालात समाजातील मोठ्या प्रमाणावर गुणवंतांनी यश मिळवले आहे. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून पुढील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या विद्यार्थ्यांनीही पुढे मोठे व्हावे हा उद्देश आहे.