राजकीय

काँग्रेस पक्षाला मतपत्रिकेवर येऊ द्या अन्यथा जिल्हात पक्ष गोठेल : अन्यथा राजीनामासत्र

माजलगाव : (प्रतिनिधी ): विधानसभा निवडणुकीच्या पार्शश्वभुमीवर भारतीय काँग्रेस पक्षाचे अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी जिल्हातील काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठिला भावनिक हाक दिली आहे.

जिल्हायातील काँग्रेस पक्ष जिवंत राहण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्टीने जिल्ह्यातील किमान तीन मतदार संघावर दावा केला होता, परंतु आघाडी धर्मात जुळून घेण्यासाठी किमान परळी आणि केज हे दोन मतदार संघ सोडून घ्यावेत असा आग्रह होता.परंतु आघाडी मध्ये काँग्रेस ला जिल्ह्यातील एकाही मतदार संघात काँग्रेस पक्षाला जागा मिळत नसेल तर, जिल्ह्यातील भारतीय काँग्रेस पक्ष मतपत्रिकेवर आलाच नाही तर पक्ष आणि पक्षाच्या संघटनेशी जुडलेला कार्यकर्ते जिवंत राहणार नाहीत, परिणामी जिल्ह्यातील पक्ष संघटना गोठेल याची दक्षता पक्ष श्रेष्ठीने घ्यावी अशी भावनिक हाक पक्षाचे अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे पक्षश्रेष्ठिकडे केले आहे.तसेच सद्या काँग्रेस मधील डझन भर कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्टीकडे आपल्याकडे असणाऱ्या पदाचा व पक्ष्याच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामे देण्याच्या हालचाली सुरु केल्या असून, केज किंवा परळी मतदार संघात काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर जिल्हाभरतील काँग्रेस कार्यकर्ते सांगली पॅटर्न राबून काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतील याची नोंद पक्ष श्रेष्ठी व महाविकास आघाडी यांनी घ्यावी असा इशारा ही अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

तसेच काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान आबादित ठेवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी लढवण्याचं आव्हान करत, आपण स्वतः केज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरून पक्षाच्या सन्मानासाठी उमेदवारी लढवणारच असा इशारा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!