सामाजिक

महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन.

केज :- प्रतिनिधी.

केज तालुक्यातील कोरेगाव येथे शेतातील कृषी पंप आणि गावातील सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा,या मागणीसाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

या बाबतची माहिती अशी की कोरेगाव, ता. केज येथे मागील चार ते पाच दिवसा पासून शेतातील कृषी पंपाची वीज सुरळीत नसून थोडा वेळच वीज राहते आणि नंतर लागलीच वीज जात आहे.यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. तसेच गावातील सिंगल फेज सुध्दा बंद आहे. यामुळे येथील संतप्त नागरिकांनी दि. २७ नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारा विरुद्ध रोष व्यक्त करीत केज-बीड महामार्ग क्र. ५४८(डी) वर कोरेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनात शेतकरी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!