राज्यात सरकारस्थापनेच्या घडामोडींना वेग !

मुंबई:- वार्ताहर
राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांकडून आजच गट नेत्याची निवडही करण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या विधीमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर सर्व आमदारांनी अनुमोदन दिले. भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच्या उपस्थितीत पार पडली. आज सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आमदारांची बैठकीनंतर ही निवडप्रक्रिया पार पडली. यानंतर महायुतीचे नेते राजभवनात जाऊन राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करतील.