जिथे कमी तिथे आम्ही या उक्ती प्रमाणे तेरणा युथ फाऊंडेशनचे कार्य

धाराशिव :- प्रतिनिधी
जिथे कमी तिथे आम्ही या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्याची आवड असणारे मेघदादा राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. या कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवकांची तेरणा युथ फाऊंडेशनच्या विविध पदावर निवड करण्यात आली आहे.
त्यात तेरणा युथ फाऊंडेशनच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी मेघदादा राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक श्री.नितीन खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे.तसे अधिकृत पत्र मेघदादा राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथे आयोजित केलेल्या युवक मेळावा कार्यक्रमांत देण्यात आले.तसेच धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी श्री. प्रवीण शेटे(कोंड) आणि धाराशिव शहराध्यक्षपदी श्री. गणेश इंगळगी(धाराशिव) यांच्याही निवडी करण्यात आल्या.तसेच तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री. मेघराज बागल(सांगवी), उपाध्यक्षपदी श्री. सयाजी शिंदे(मंगरूळ) आणि तुळजापूर शहराध्यक्षपदी श्री. दिनेश पलंगे(तुळजापूर) यांची निवड करण्यात आली आहे. नळदुर्ग शहराध्यक्षपदी श्री. अशीतोष नाईक व श्री. मुदसिर शेख यांची निवड करण्यात आली आहे.
तेरणा युथ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे संस्थापक मेघदादा राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.
चौकट :- ढोकी येथील नितीन खंडागळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.मेघदादा राणाजगजितसिंह पाटील संस्थापक असलेल्या तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. या कार्यात मोलाची कामगिरी बजावणारे श्री.नितीन खंडागळे यांची तेरणा युथ फाऊंडेशनच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.