सामाजिक

स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळाचे वाटप

केज/प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांच्या हातून रुग्णाची सेवा घडावी या संकल्पनेतून केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने फळाचे वाटप करण्यात आले.यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रकार बांधव हे पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देतातच त्याचबरोबर गरजू रुग्णांना फळ वाटपाच्या कार्यक्रमातून देखील एक सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार बांधव हे सहकार्य करत आहेत त्याबद्दल त्यांनी पत्रकार बांधवांचे कौतुक केले व प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ‌.महेश कांबळे, परिचर संतोष शेळके,परिचारिका सोपनाजा सोनवणे मॅडम, बीड न्यूज चैनलचे संपादक मुबाशीर खतीब, दैनिक लोकनायकचे केजतालुका प्रतिनिधी महादेव काळे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष तात्या गवळी, उपाध्यक्ष संजय खळगे, सचिव वसंत सोनवणे, सहसचिव विकास सोनवणे, कोषाध्यक्ष विवेक बनसोड, प्रसिद्धीप्रमुख विनोद पवार, कायदेविषयक सल्लागार ॲड.सतीश मस्के, ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक अशोक नागरगोजे, बाळासाहेब गलांडे, संघरत्न शिंदे, सुहास पवार, बापूराव कराड, मेजर के.एस.घुल,एस.एन.घुले, आत्मलिंग खरबड, सिद्धार्थ मुंडे यांच्यासह पत्रकार बांधव व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, परिचारक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!