छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन होणार !

केज :- प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची व त्यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यांचे आंदोलन हे सकळ मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याने समाजाने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो.
शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ चर्चा करावी यासाठी केज तालुका सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने गुरुवार दि 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केज च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेत हे आंदोलन केले जाणार आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.