शैक्षणिक

जनविकास महाविद्यालयात करियर कट्टा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

केज :- दत्तात्रय मुजमुले
जनविकास महाविद्यालयात करियर कट्टा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमासंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून करिअर कट्टाचे बीड जिल्हा समन्वयक व सरस्वती महाविद्यालय , केज येथील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. नागेश कराळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे होते. तर या कार्यक्रमाचे संयोजक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. राजेश गायकवाड याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलतांना प्रमुख मार्गदर्शक तथा जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. नागेश कराळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टाचे महत्त्व सांगितले व याचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. डॉ. बाबासाहेब गोरे यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात या शासनाच्या उपक्रमात सहभागी होण्याविषयीचे महत्व पटवुन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक व महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.चिताडे नंदकिशोर यांनी केले तर आभार प्रा. राऊत सुनील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!