केज तालुका काँग्रेस कमिटीच्या आनंदोत्सव साजरा

केज :- दत्तात्रय मुजमुले
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे निलंबन रद्द ठरवत न्यायालयाने त्यांना खासदारकी कायम ठेवली.त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांचे राज्यसभेतून केलेले निलंबन रद्द ठरवले आहे या निर्णयाचे स्वागत केज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेढे वाटून,फटाके फोडत केले आहे.तर हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याचे केज तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी म्हटले आहे.
राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील राज्यसभेत नेहमी आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न मांडत असतात. मागील कालावधीमध्ये वारंवार सरकारला धारेवर धरल्याने शब्दावली चित्रीकरण केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते ते निलंबन उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी निलंबन रद्द ठरवत लोकशाहीला अभिप्रेत निर्णय दिला आहे.
काँग्रेसच्या नेत्या रजनीताई अशोकराव पाटील जनसमान्यांचा आवाज राज्यसभेमध्ये सातत्याने पोहोचवणार आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून त्या राज्यसभेतून निलंबित होत्या.त्यांचे निलंबन रद्द ठरवल्याने त्या आता पुन्हा राज्यसभा सभागृहात कायम राहणार आहेत याबद्दल केज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेढे वाटून,फटाके फोडून सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.