आरोग्य

डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

केज :- प्रतिनिधी

योध्दा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्यास बदनाम केले जाते अशी काहीशी अनुभूती आली ती,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याप्रती.लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील भरती गैरव्यवहार प्रकरणात बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा विधानपरिषदेत करण्यात आली आहे.विधान परिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी मांडली आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ त्याला दुजोरा देत तडका फडकी डॉ. साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. ही बाब न रूचणारी असून यात राजकीय षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे.करे कोई ओर भरे कोई असे हे प्रकरण झाले असल्याची चर्चा जिल्हाभर आहे.या प्रकरणाशी डॉ.साबळे यांचा वास्तविक काहीच संबंध नाही. मात्र मुद्दामहून त्यांना अडकविण्यात आले आहे. डॉ.साबळे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर झालेला हा अन्याय असून त्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा राम जोगदंड सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सरपंच मौजे भाटुंबा यांनी दिला आहे.

ज्या डॉ.साबळेना पूर्ण जिल्हा गोर गोरगरीब जनतेचे कैवारी असलेले जननायक,आरोग्यदूत समजतो अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास राजकीय षडयंत्र रचून भरती गैरव्यवहार प्रकरणात अडकवले आहे.डॉ. सुरेश साबळे यांनी सी एस पदाला साजेशी कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी उपचारांच्या सोयी सुविधा अत्यंत चांगल्या दर्जाच्या दिल्या. आरोग्य प्रति त्यांची असलेली तळमळ आणि सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्व जिल्हा वासियांना माहित आहेत. मात्र कंत्राटी नोकर भरतीच्या प्रकरणात उखळ पांढरे करणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांना मुद्दामहून यात गोवले आहे. चांगले अधिकारी हे राजकीय पुढाऱ्यांना जमत नाहीत.

मात्र त्यांची सर्व सामान्य जनतेला गरज आहे ही बाब लक्षात घेऊन डॉ.साबळे यांचे निलंबन मागे घावे अन्यथा केज तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असा इशाराही राम जोगदंड सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सरपंच मौजे भाटुंबा यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!