मातग समाजाच्या वतीने औरंगाबाद येथील मनोज आवाड यांच्या हत्या च्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले

गुरूवार दिनांक 5/5/2022रोजी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्यात मातंग समाजावरती वाढत चाललेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ प्रामुख्याने औरंगाबाद मधील मनोज आव्हाड या मातंग समाजातील युवकाची दगडाने लाटी काठीच्या साह्याने खुन करण्यात आला यांच्या निषेधनार्थ क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पुतळा चिंचवड स्टेशन या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
प्रास्ताविक मातंग समाजातील युवक नेतृत्व तथा शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केले. ते म्हणाले महाराष्ट्र राज्यात मातंग समाजातील व्यक्तीवर प्रामुख्याने अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहे ही अत्यंत गंभीर बाब असुन महाविकास आघाडीच्या सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी विनंती युवराज दाखले यांनी पोलिस प्रशासन गुप्तचर यंत्रणेला केली.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी आपले निषेध मत व्यक्त करताना आसे म्हणाले की,औरंगाबाद येथील मनोज आव्हाड यांचा खुन करणार्या समाजकंटकना मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेब यांची नेमणूक करून सदरील खटला जलद गतीने चालवण्यात यावा अशी मागणी केली.
तसेच समाजकंटकांनी समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तो सर्व समाज बांधवांनी हानुन पाडावा अन्यथा वाईट परिस्थिती निर्माण होईल असे मत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी व्यक्त केले. तसेच त्या पिडीत कुटुंबाला 25लाख रूपये मदत महाविकास आघाडीच्या सरकारने करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने अडागळे यांनी केली.
यावेळी जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे,संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल,युवा नेते युवराज दाखले, अध्यक्ष संजय ससाने,नाना कसबे, भगवान शिंदे, मारूती दाखले,राजु आवळे,अनिल सौदडे,अविनाश कांबीकर, चंद्रकांत लोंढे, सविता ताई आव्हाड, अण्णा कसबे,सतिष भवाळ,अनिल तांबे,अरूण जोगदंड, शिवाजी साळवे,मयुर गायकवाड, स्वत्निल (आण्णा) जाधव ,विजय दणके,अक्षय दुनघव,हिरामण खवळे,मोहन भिसे, सुनील भिसे,विजय कांबळे, किशोर हतागळे,मिनाताई कांबळे, आदी प्रमुख पदाधिकारी यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.