सामाजिक

स्व. सुधाकरराव शिंदे यांच्या पुण्यातिथी निमित्त शालेय साहित्याचे वाटप

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे होळचे उच्चशिक्षित नेतृत्व ज्यांनी गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रामध्ये अनमोल असे योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होळचे माजी सरपंच स्व. सुधाकरराव शिंदे यांच्या पुण्यातिथी निमित्त जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, होळ येथे त्यांचे सुपुत्र संग्राम (भैय्या) शिंदे यांच्या पुढाकारामधून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेवाटप करण्यात आले.

मौजे होळच्या विकासात नेहमीच माजी सरपंच स्व. सुधाकरराव शिंदे यांचे भरीव योगदान राहिले आहे.पंचक्रोशीत त्यांच्या नावाची मोठी ओळख होती.. सुधाकरराव शिंदे यांच्या पुण्यातिथी निमित्त शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी संग्राम (भैय्या) शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेश शिंदे,धनराज (भाऊ) लाटे, बबन (भैय्या) शिंदे, रामेश्वर शिंदे, बाबुरावजी यादव,शाळेमधील सर्व शिक्षक वृंद यांच्यासह इतर नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!