आरोग्य
नायगांव येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”अभियानांतर्गत 44 मातांची तपासणी

केज :- दत्तात्रय मुजमुले
मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रामध्ये दि.२६.०९.२०२२ ते दि.०५.१०.२०२२ या कालावधी मध्ये “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये १८ वर्षावरील महिला,बालके व गरोदर माता यांची तपासणी करून पुर्णपणे मोफत सेवा देण्यात येणार आहेत. सदर अभियानात स्त्रीरोग तज्ञांमार्फत गरोदर महिलांची तपासणी,गरोदर महिलांची शारीरीक तपासणी.(यामध्ये वजन,रक्तदाब, हिमोग्लोबीन,रक्तगट) तपासणी करण्यात आली.तर १८ वर्षांवरील मुलींचे वरिल कालावधी मध्ये गर्भधारणा पुर्व काळजी,मासिक पाळी मधील समस्या,सॅनिटरी पॅडस्चा वापर,मासिक आरोग्य या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच ३० वर्षावरील सर्व महिलांची रक्तदाब,मधुमेह व कर्करोगा संबंधी तपासणी, क्ष-किरण तपासणी,बालकांचे लसिकरण तसेच कोविड लसिकरण करण्यात येणार आहे. दरम्यान,शालेय आरोग्य तपासणी पथका मार्फत शाळेतील बालकांची तपासणी करण्यात येणार आहेत.आज सुरू झालेल्या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घेतली.
या अभियानासाठी आरोग्य सेविका शिंदे.ए.पी,एम. पी डब्ल्यू दत्तात्रय राऊत, आशा स्वयंसेविका संध्याताई मुजमुले, आंगणवाडी कार्यकर्त्या मुमताज शेख ,मदतनीस सुनंदा महामुनी हजर होत्या.